![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/09/gold.jpg?width=380&height=214)
Gold Price Today: आज सोन्याच्या किमतीत (Gold Rate Today) मोठी वाढ झाली आहे. यासोबतच चांदीच्या किमतीत देखील वाढ होताना दिसत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या टॅरिफ वॉरमुळे, सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे किमती सतत वाढत आहेत. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, सोन्याचे आजचे दर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण निकालापूर्वी शुक्रवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये चांगली वाढ दिसून आली. बाजारातील सहभागींना भारताच्या मध्यवर्ती बँकेकडून 25 बेसिस पॉइंट्स दर कपातीची अपेक्षा आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आजसकाळी 10 वाजता चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) च्या धोरणात्मक निर्णयाची घोषणा करतील. रॉयटर्सच्या मते, आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकी पातळीजवळ व्यवहार करत आहेत, व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे सलग सहाव्या आठवड्यात वाढ सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तथापी, गुंतवणूकदारांचे लक्ष आता आरबीआयच्या चलनवाढ-वाढीच्या अंदाजावर आहे. (हेही वाचा - RBI's Monetary Policy Review: आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा आज रेपो रेट जाहीर करणार, 25 बेसिस पॉइंट कपातीची शक्यता)
सोन्याचे आजचे दर -
मुंबईत आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,880 रुपये इतकी आहे. तथापी, पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,930 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,651 रुपये आहे.
या वर्षी सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत स्पॉट गोल्डच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या आहेत. रुपयाची कमजोरी, अमेरिका आणि त्याच्या व्यापारी भागीदारांमधील व्यापार युद्धाची भीती आणि आर्थिक मंदीची चिन्हे यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात आणि चलन मूल्यात घसरण होत असताना सोन्याच्या किमती वाढतात.