Delhi Shocker: दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर (Malviya Nagar) भागातील एका उद्यानात शुक्रवारी सकाळी 17 वर्षीय मुलाचा चाकूने वार केलेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead Body) आढळला. सातपुला पार्कमध्ये मृतदेह आढळल्याबाबत शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पीसीआर कॉल आला. पोलीस खिरकी गावाजवळ (Khirki Village) घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना पोट, छाती, मानेवर आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा असलेला मृतदेह आढळून आला. बेगमपूर येथील इंद्रा कॅम्प येथील विवेक असे पीडित मुलाचे नाव असल्याचे पोलीस उपायुक्त (दक्षिण) चंदन चौधरी यांनी सांगितले.
तपासादरम्यान तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत समोर आले की, त्यातील एकाने त्याच्या पाच मित्रांसह (सर्व अल्पवयीन) विवेकला मारण्याचा कट रचला होता. गुरुवारी त्याने विवेकला दारू पिण्यासाठी बोलावले. तो त्याला मालवीय नगर येथील सातपुला पार्कमध्ये घेऊन गेला, तेथे त्याचे पाच मित्र आधीच हजर होते. (हेही वाचा -Uttar Pradesh Shocker: यूपीहून येणाऱ्या बसमध्ये दलित महिलेवर सामूहिक बलात्कार, एकाला अटक
मद्यपान केल्यानंतर विवेकवर त्यांनी चाकू आणि दगडांनी हल्ला केला. त्यातील एका अल्पवयीन मुलाचे काही महिन्यांपूर्वी विवेकसोबत भांडण झाले होते. विवेकने अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. तेव्हापासून विवेकचा राग बाळगणाऱ्या या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह त्याच्यावर हल्ला केला. (हेही वाचा -Jabalpur Man Shoots Woman: जबलपूरमध्ये नाईट वॉकला गेलेल्या महिलेची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
दरम्यान, घटनास्थळावरून दोन रक्ताने माखलेले चाकू जप्त करण्यात आले आहेत. तीन अल्पवयीनांना अद्याप पकडण्यात आले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.