ध्यानचंद हॉकी टूर्नामेंटमधील (Dhyanchand Hockey Tournament) सेमीफाइनल खेळायला जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडूंच्या (Hockey players) कारला अपघात (Car Accident) होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. ही दुर्देवी घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) होशंगाबाद (Hoshangabad) येथे सोमवारी सकाळी घडली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला जाऊन धडकली, ज्यामुळे हा अनर्थ घडला. हे सर्व खेळाडू भोपाळ अकादमीतील आहेत. या अपघाताने मृतांच्या कुंटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळला आहे.
रविवारी आदर्श हरदुआ याचा वाढदिवस होता. या निमित्ताने हरदुआ याच्या आई-वडिलांनी प्रशिक्षकाला त्याच्या राहत्या घरी इटारसी येथे भेट देण्याची विनंती केली. होशंगाबाद ते इटारसी हे अंतर अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असल्याने प्रशिक्षकाने होकार दिला. हरदुआ याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही खेळाडूसह प्रशिक्षकासह त्याच्या राहत्या घरी पोहचले. परंतु, सोमवारी सेमिफायनचा सामना खेळण्यासाठी जात असताना समोरुन आलेल्या बोलेरो जीपची टक्कर टाळण्याचा प्रयत्न करताना चालकाने आपला तोल गमावला आणि वाहन रस्त्यावरील झाडाला जाऊन धडकले. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.शाहनवाज खान, आदर्श हरदुआ, अशिष लाल, अनिकेत वरुण, अशी मृत खेळाडूंची नावे आहेत. शॉन गिडीयन, अल्फ्रेड, अक्षय अवस्थी आणि साहिल चौधरी असे जखमींचे नावे असून त्यांना हिशंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 2 जण अकादमीचे प्रशिक्षणार्थी आहेत तर, शॉन गिडियन हे अकादमीचे माजी प्रशिक्षक आहेत. हे देखील वाचा- कानपूर येथे पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 12 डबे रुळावरून घसरले, अनेकजण जखमी
एएनआयचे ट्विट-
Madhya Pradesh: Four national level hockey players dead, three injured, in a car accident in Hoshangabad pic.twitter.com/otLiRNQzoQ
— ANI (@ANI) October 14, 2019
दरम्यान, होशंगाबादचे पोलिस अधीक्षक एम.एल.छारी म्हणाले की, निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. वाहन नियंत्रणातून बाहेर गेले आणि झाडावर धडकले. जेव्हा अपघात झाला तेव्हा गाडी वेगात होती, असे ते म्हणाले आहेत.