Delhi Crime: सलूनमध्ये भरदिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यू, दिल्लीतील नजफगढ येथे खळबळ
Delhi Crime pC twitter

Delhi Crime: दिल्लीत गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. दरम्यान शहरातील एका सलूनमध्ये भरदिवसा गोळीबार करून दोन तरुणांची हत्या केली आहे. ही घटना नजफगढ भागातून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सलूनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल देखील होत आहे. दोन अज्ञात हल्लेखोर सलूनमध्ये आले आणि गोळीबार केला. सलूनमध्ये आलेल्या ग्राहकावर गोळीबार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- फुलांच्या शेतात 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार)

मिळालेल्या माहितीनुसार, नजफगढ पोलिस स्टेशनला सलूनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखा आणि स्पेशल सेलच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आरोपी फरार असल्याने सलूनमध्ये पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सलूनमध्ये गोळीबार झाल्याचे समजताच, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सलूनमध्ये दोन जण गोळीबारात जखमी झाले होते त्याना मोहन गार्डन परिसरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकिय उपचारादरम्यान दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, हल्लेखोरांनी एका तरुणाच्या डोक्यात गोळीबार केला.

सोनू आणि आशिष अशी मृतांची ओळख झाली आहे.पोलिसांनी सांगितले की, सोनूच्या डोक्यात एक गोळी लागली तर आशिषच्या डोक्यात तीन आणि छातीत एक गोळी लागली. या हल्ल्यामागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचा संशय प्रथमदर्शीनी व्यक्त केला. दोघेही नजफगढ भागातील नागली सकरावती येथील रहिवासी होते. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्लेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भरदिवसा झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.