Greater Noida Shocker: ग्रेटर नोएडामधील लज्जास्पद घटना; फुलांच्या शेतात 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती चिंताजनक
Minor Rape Case (Photo Credit- Pixabay)

Greater Noida Shocker: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथून अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. गुरुवारी एका तीन वर्षांच्या मुलीवर राबुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलांच्या शेतात बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. रक्तबंबाळ झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलगी बराच वेळ मदतीची वाट पाहत होती. शेवटी ये-जा करणाऱ्यांनी तिचा रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर पीडितेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेची प्रकृती ठीक आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ग्रेटर नोएडामध्ये तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींसोबत पोलिसांची चकमक झाली. चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागली, त्यामुळे तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Dombivli Rape Case: पोलीस असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोंबिवली येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रेटर नोएडातील रबुपुरा पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे पोलिसांची बलात्काराच्या आरोपींसोबत चकमक झाली. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. बचावात पोलिसांनी आरोपीवर गोळी झाडली. या चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागली.