Stop Rape (Representative image)

डोंबिवली (Dombivli Rape Case) येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसर हादरुन गेला आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन दोन आरोपींनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. ही घटना ठाकुर्ली रेल्वे स्टेशन (Thakurli Railway Station) परिसरात पश्चिमेस असलेल्या विष्णुनगर (Vishnunagar ) येथे घडली. दोन अज्ञात आरोपींनी पीडितेला गाठले. तिला आपण पोलिस असल्याचे सांगितले. तसेच, तुची चौकशी करायची आहे असे सांगून तिला खाडी किनाऱ्यावर असलेल्या जंगलात नेऊन निर्जन स्थळी तिच्याबर बलात्कार केला. पीडितेची कोणतीही परवानगी नसताना आरोपींनी तिच्यासोबत जबरसत्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

ठाकुर्ली रेल्व स्टेशन परिसरात शुक्रवारी (27 जानेवारी) दुपारी 3.30 च्या दरम्यान ही घटना घडली. घडल्या प्रकारामुळे पीडिता गांगरुन गेली. परंतू, तिने धीर एकवटून पोलीस स्टेशन गाठले. तिथे जाऊन तिने पोलिसांत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. (हेही वाचा, Good Touch, Bad Touch: मिठी मारुन चुंबण घेणाऱ्या शिक्षकाचा भांडाफोड; 'गुड टच बॅड टच' उपक्रमात विद्यार्थींनीची धक्कादायक माहिती)

शुक्रवारी दुपारी ३.३०च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ पश्चिम येथे दोन अनोळखी आरोपीनी फिर्यादीला पोलीस असल्याची धमकी दिली आणि तिचा मित्राची चौकशी करण्याच्या बहाण्याने ठाकुर्ली येथील खाडी किना-या जवळ जंगलात, निर्जनस्थळी नेऊन फिर्यादीची कोणतीही संमती नसताना, जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. दरम्यन, पीडितेने माहिती देताना सांगितले की, आरोपी साधारण 25 ते 35 या वयोगटातील होते. त्यांनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ चित्रीत केला. तसेच घडलेली घटना कोणाला सांगितली तर, व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करेन, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे पीडितेने सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी पीडितेने दिलेल्या माहितीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आोरोपी फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, डोंबिवली परिसरातील विष्णुनगर हद्दीत हा धक्कादायक प्रकार भरदिवसा घडला. त्यामुळे पोलीसांची सुरक्षा नेमकी कोणत्या स्वरपाची असते. पोलीस गस्त घालतात किंवा नाही असाच सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. डोंबिवलीमध्ये पाठिमागील काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनात वाढ झाली आहे. प्रामुख्याने घरफोडी, चोरी अशा प्रकारेच गुन्हेही वाढले आहेत.