
Firing In Kolkata: कोलकाता (Kolkata) मध्ये बांगलादेशच्या उप उच्चायुक्तालयासमोर (Bangladesh Deputy High Commission) गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार एका पोलिसाने केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर गोंधळ उडाला. या पोलिसाने रस्त्याने येणाऱ्या एका महिलेवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसाने स्वत:वर ही गोळी झाडली. यासंदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस कर्मचारी अचानक बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरू केल्या. गोळीबारात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. त्याचवेळी गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडली. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा पोलीस कर्मचारी कोण होता आणि त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. याशिवाय पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचीही ओळख पटलेली नाही. (हेही वाचा - Delhi: दिल्ली येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार, Dating Appच्या माध्यमातून झालेल्या भेटीतून कृत्य)
या घटनेसंदर्भात बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या रायफलमधून गोळीबार केला. त्यामुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या महिलेला गोळी लागली आणि ती दुचाकीवरून पडली. गोळीबारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही काळ गोळीबार केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली.
पश्चिम बंगाल: कोलकाता में बांग्लादेश उप उच्चायोग के बाहर पुलिस के एक जवान की गोली लगने से एक महिला बाइक सवार की मौत हो गई। इसके बाद पुलिसकर्मी ने खुद को गोली मार ली। पुलिस के आला अधिकारी मौके पर मौजूद हैं। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/nHSfMG9ooz
— ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2022
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा करणाऱ्या बबलू शेखने सांगितले की, संपूर्ण घटना सुमारे पाच मिनिटे चालली. या घटनेनंतर काही मिनिटांतचं मोठ्या संख्येने पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.