Nainital Accident: नैनिताल (Nainital) मध्ये भाजप (BJP) नेत्याच्या कारचा भीषण अपघात (Accident) घडल्याची घटना समोर आली आहे. पदमपूर देवलिया मोताहळदू येथील रहिवासी असलेल्या भाजप नेत्याची कार खोल खड्ड्यात पडली. या अपगातात भाजप नेत्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी भाजप नेत्याला घटनास्थळावरून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.
पदमपूर देवलिया येथील सचिन कुमार जोशी (वय,38) हे भाजपच्या पूर्व विभागात मंत्री होते. बुधवारी सकाळी त्यांना बागवली पोखर राणीखेत येथे निविदा सादर करण्यासाठी जायचे होते. ते सकाळी साडेआठ वाजता कारने राणीखेतकडे निघाले. (हेही वाचा -Mumbai-Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू तर पाच जखमी)
सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी घरच्यांना फोन करून आपण कैंची मंदिरासमोर आल्याचे सांगितले. लवकरच घरी पोहोचेल असंही सांगितलं. मात्र, बराच वेळ उलटला तरी ते घरी आले नाहीत. तसेच त्यांच्या पत्नीने अनेकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर पत्नीने सचिन कुमार यांच्या मित्राला याबाबात माहिती दिली. त्यांचा शोध घेण्यासाठी मित्र जिओलीकोटला गेला. मात्र, तेथे सचिन कुमार कोठेही दिसले नाही किंवा त्यांच्याशी काहीही संपर्क होऊ शकला नाही. (हेही वाचा- Karnataka: विजयपुरा येथील गोदामात मोठा अपघात; अंगावर मक्याच्या पोत्यांचा ढीग पडल्याने 8 कामगारांचा मृत्यू)
दरम्यान, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबडावजवळ एक कार खड्ड्यात पडल्याची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सचिनच्या पत्नीला फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी त्यांला खड्ड्यातून बाहेर काढले आणि बेस हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तथापी, सचिन यांच्या मृत्यूनंतर भाजपचे अनेक नेते रुग्णालयात पोहोचले. दुसरीकडे, पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. सचिन यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.