Farmers Protest To Farm Bills | (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) दिल्लीत गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत आणि किमान आधारभूत किंमत संदर्भात कायदा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, रविवारी म्हणजे उद्या (13 डिसेंबर) राजस्थान सीमेवरून हजारो शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढतील आणि दिल्ली जयपूर हायवे रोखतील, असे संयुक्त शेतकरी आंदोलनाचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू म्हणाले आहेत.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत. आमचे आंदोलन शांततेत असेल. आंदोलनाला चिथावणी देण्याचा आणि फूट पाडण्याचा सरकारने पुरेपूर प्रयत्न केला. यश येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असेही कमलप्रीत सिंह पन्नू म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Farmer's Protest: शेतकऱ्यांच्या आंदोलनात मसाज पार्लर नंतर आता उभी राहिली जिम; वेटलिफ्टरपासून ते कबड्डीपटूपर्यंत अनेक तरुण करत आहेत व्यायाम (See Photos)

एएनआयचे ट्विट-

देशात येत्या 14 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या दिवशी शेतकरी नेते सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायदा मागे घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत. पण हे कायदे रद्द होईपर्यंत तोपर्यंत चौथ्या मागणीवर आम्ही जाणार नाही, असे आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.