Sukhwinder Sukhu Cabinet Expansion (PC - ANI)

Sukhwinder Sukhu Cabinet Expansion: हिमाचल प्रदेशातील सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Sukhu) यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार झाला असून काँग्रेसच्या सात आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या आमदारांना कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) करण्यात आले आहे त्यात डॉ. धनी राम शांडिल, चंदर कुमार, हर्षवर्धन चौहान, जगत सिंह नेगी, रोहित ठाकूर, अनिरुद्ध सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीर भद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांचाही कॅबिनेट मंत्र्यांमध्ये समावेश आहे. विक्रमादित्य सिंग यांच्या आई सध्या हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.

सखू मंत्रिमंडळात आणखी तीन आमदारांना मंत्री केले जाऊ शकते. ही रिक्त पदे नंतर भरली जातील. हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 12 आमदार मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात. सात आमदार मंत्री झाल्यानंतर आता 9 जण मंत्रिमंडळात आले आहेत. (हेहू वाचा - Kanjhawala Death Case: कांजवाला मृत्यू प्रकरणी सातवा आरोपी अंकुशला दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाकडून जामीन मंजूर)

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शनिवारी सांगितले होते की, त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी संभाव्यांची यादी मंजुरीसाठी काँग्रेस हायकमांडकडे सोपवली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, रविवारी किंवा त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य आहे. सखू यांनी दिल्लीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी या विषयावर चर्चा केली होती.

ही यादी हायकमांडकडे सोपवण्यात आली असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मंजुरीनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सखू म्हणाले होते. मंत्रिमंडळात 10 पदे रिक्त आहेत. कारण हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा जास्त असू शकत नाही. हिमाचल प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर सुखविंदर सिंग सुखू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.