Amit Shah Reply To Arvind Kejriwal: 'मोदी 75 वर्षांचे झाले तरी तेचं पंतप्रधान होतील'; अरविंद केजरीवाल यांना अमित शहांचे प्रत्युत्तर
Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Amit Shah Reply To Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या खळबळजनक दाव्याला खुद्द गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'भाजपचे संविधान असे म्हणत नाही की वयाच्या 75 वर्षांनंतर पक्षाचा कोणताही नेता पंतप्रधान होऊ शकत नाही. निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भाजप (BJP) कडून पंतप्रधान होतील, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. तथापी, अरविंद केजरीवाल यांनी आज दावा केला होता की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकले तरी पुढील वर्षापर्यंत पंतप्रधान मोदीच राहतील. 75 वर्षांनंतर त्यांच्या पक्षातील कोणीही सक्रिय राजकारणात राहणार नाही, असा नियम पंतप्रधान मोदींनी स्वतः बनवला आहे. यावेळी भाजपने निवडणूक जिंकली तर पुढील वर्षी पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे होतील आणि त्यानंतर अमित शहा पंतप्रधान होतील, असंही केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'हे लोक इंडिया ब्लॉकला पंतप्रधानपदासाठी चेहऱ्याबद्दल विचारतात. मी भाजपला विचारतो की त्यांचा पंतप्रधान कोण असेल? नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. त्यांनी स्वतः एक नियम बनवला आहे. 75 वर्षांचे लोक निवृत्त होणार आहेत, हे स्पष्ट आहे की ते शहांना पंतप्रधान बनवण्यासाठी मतं मागत आहेत का?' (हेही वाचा -Arvind Kejriwal Roadshow: अरविंद केजरीवाल सक्रीय, हनुमान मंदिर भेटीसह करणार रोड शो; पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष, घ्या जाणून)

अमित शहा यांचे अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर -

केजरीवाल यांना प्रत्युत्तर देताना अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यावर पंतप्रधान पद सोडतील असे सांगून मोठी चूक करत आहेत. मी अरविंद केजरीवाल अँड कंपनी आणि इंडिया ब्लॉकला सांगू इच्छितो की, भाजपच्या घटनेत (75 वर्षे जुना मर्यादा नियम) अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. पंतप्रधान मोदी केवळ हा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. तर भविष्यात पंतप्रधान मोदी देशाचे नेतृत्व करत राहतील यात शंका नाही.' (हेही वाचा, Arvind Kejriwal Get Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातून 'या' तारखेपर्यंत जामीन मंजूर)

दरम्यान, यावेळी केजरीवाल यांच्या आत्मविश्वासवरही गृहमंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केजरीवाल यांना केवळ न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला असून तो तात्पुरता असल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. तथापी, अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. केजरीवाल यांना 1 जूनपर्यंतच अंतरिम जामीन मिळाला असून त्यांना 2 जूनला एजन्सीसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे.