कोरोना संकटाच्या काळात कर्मचारी भविष्य निधी संघटनकडून पेन्शनधारकांना गुड न्यूज देण्यात आली आहे. आता निवृत्ताधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे. सोमवारी ईपीएफओने बदललेली मूल्य पुनर्संचयित करण्यासाठी एकूण 973 कोटी जारी केले, या पेन्शनासाठी 868 कोटी रुपये, तर थकबाकी म्हणून 105 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी पेन्शन पुनर्संचयित करण्यासाठी कुठलीही तरतूद नव्हती. त्यामुळे निवृत्तीधारकांना कमी पेन्शन मिळत असे. मात्र, आता या संकटकाळात निवृत्तीधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. आता निवृत्ताधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे.
ईपीएफओबाबत निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. या अंतर्गत कामगारांना 15 वषार्नंतर निवृत्तीवेतनाचे बदललेले मूल्य पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात आली. आतापर्यंत पेन्शन पुनर्संचयित करण्याची कोणतीही तरतूद नव्हती त्यामुळे निवृत्तीधारकांना कमी पेन्शन मिळत असे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ईपीएफओ 95 च्या अंतर्गत पेन्शन धारकांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास 65 लाख निवृत्तीधारकांना फायदा मिळणार आहे. हे देखील वाचा- LPG Cylinder Price Hike: घरगुती एलपीजी सिलेंडर आजपासून महागणार; जाणून घ्या नवे दर
जर कर्मचाऱ्याने निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेपैकी एक तृतीयांश रक्कम काढून घेतली, आणि त्यांना 5 हजार रुपये पेन्शन लागू असेल. तर त्यांना साधारणत 3 हजार 500 रुपयेच पेन्शन मिळत होती. 15 वर्षे ही पेन्शन घेतल्यानंतर यापुढे दर महिन्याला त्यांना मूळ रक्कम म्हणजेच पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.