Represenational Image(File Photo)

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) थिरुप्पुर (Tiruppur) येथे जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीचा गळा कापल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (14 ऑगस्ट) घडली आहे. या हल्ल्यात पीडित मुलगी जखमी झाली असून ती सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 19 वर्षाची असून थिरूप्पुर येथील एका गारमेन्टच्या कारखान्यात काम करते. याच कारखान्यात काम करणाऱ्या मोहम्मद यासीन याच्याशी मैत्री झाली. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. हे दोघेही चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. याचदरम्यान, या दोघांनी गेल्या माहिन्यात 16 जुलै रोजी पळून जाऊन लग्न केले. तेव्हापासून पीडित आपल्या पतीसह राहू लागली. हे देखील वाचा- Bihar Triple Murder: खळबळजनक! एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या, जावयावर खुनाचा संशय; पोलीस तपास सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित शनिवारी एकटीच घरात होती. त्यावेळी आरोपी मद्यधुंद तिचे वडील तिच्या घरी गेले आणि तिच्यावर पेपर कटरने प्राणघातक केला. दरम्यान, पीडित जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. ज्यामुळे घाबरून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. ज्यामुळे तिचा जीव वाचला आहे. या घटनेनंतर आरोपी अटक करण्यात आली आहे.