इजिप्तमध्ये 40 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

कैरो येथील गिझा येथे आत्मघाती बाँम्ब हल्ला करण्यात आला त्यावेळी पर्यटक आणि त्यांच्यासोबत असलेल्या गाईडचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत 40 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये, संशयित देश किंवा पर्यटक संस्थावर हल्ला करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी गिझामधून 14 आणि 16 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

दशतवाद्यांकडून शस्रास्त्रे, दारुगोळा सारखे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. तसेच गिझा प्रशाकीय हद्दीत आणि उत्तर सिनाई द्विकल्पात दशतवादी मारले गेल्याची माहिती अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे.