Indian Railway | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

WCR Recruitment 2021: पश्चिम रेल्वेमध्ये स्टेशन मास्टरच्या पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 38 पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी डब्लूसीआरची अधिकृत वेबसाइट https://wcr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्यावी. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै आहे. त्यानंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे. डब्लूसीआरकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावार पदवीधर असावा.

या नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाची सुरुवात दिनांक 26 जून असून अंतिम तारीख 26 जुलै दिली आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्ष असावे. तसेच एससी/एसटी उमेदवारांसाठी 45 वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी 43 वर्ष वय असावे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.(Indian Navy SSC IT Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएटसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रियेसंबंधित अधिक)

स्टेशन मास्टर पोस्टसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड तीन टप्प्यात होणाऱ्या परीक्षेच्या आधारावर असणार आहे. त्यानुसार निवड कंप्युटर आधारित टेस्ट आणि अॅप्टिट्युड टेस्टसह कागदपत्रांचे वेरिफिकेशन/मेडिकल परीक्षेचा समावेश असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराठी वेतन 61,400 रुपये प्रति महिना असणार आहे.

तसेच सेंट्र्ल रिजर्व पोलीस फोर्स मध्ये नोकर भरती संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार योग्य उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तर सीआरपीएफमध्ये फिजियोथेरपिस्ट आणि न्युट्रिशनिस्ट पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. स्पोर्ट्स ब्रान्च ऑफ ट्रेनिंग डिक्टोरेट, सीआरपीएफ, आरके पुरम, नवी दिल्लीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पण ही नोकर भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.