Representational Image (Photo Credits: File Photo)

UPSC Recruitment 2021:  संघ लोक सेवा आयोग, युपीएससीसाठी प्रिंसिपल पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठी एक नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केले आहे. या नोकर भरतीसाठी 363 पद भरली जाणार असून दिल्ली सरकारच्या शिक्षा निर्देशालयासाठी निवड केला जाईल. अशातच इच्छुक उमेदवारांना युपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in येथे अर्ज करता येणार आहे.(UPSC Civil Services Prelims 2021: यूपीएससीच्या प्रिलिम्स परीक्षेच्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यासाठी 12 जुलै पासून खुल्या होणार अ‍ॅप्लिकेशन विंडो)

आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिसनुसार, प्रिंसपल पदासाठी एकूण 363 पद भरली जाणार आहेत. यामध्ये 208 पुरुष आणि 155 महिलांचा समावेश असणारआहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2021 दिली आहे. त्यामुळे अंतिम तारखेपूर्व अर्ज भरावा अशी सुचना देण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अर्ज प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट लवकरच जाहीर केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच पश्चिम रेल्वेमध्ये स्टेशन मास्टरच्या पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 38 पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी डब्लूसीआरची अधिकृत वेबसाइट https://wcr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्यावी. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै आहे. त्यानंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे. डब्लूसीआरकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावार पदवीधर असावा.