भारतामध्ये कोरोना व्हायरसची स्थिती पाहता आता Union Public Service Commission ने नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 ( UPSC IAS Prelims 2020 Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या परीक्षा 31 मे 2020 ला होणं अपेक्षित होतं परंतू सध्याची स्थिती पाहता आता या परिक्षा देखील लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान परीक्षांच्या नव्या तारखा 20 मे दिवशी आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहेत. एकूण 796 रिक्त जागांसाठी या परिक्षा घेतल्या जाणार आहेत. भारतामध्ये 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि बोर्ड एक्झामदेखील रद्द झाल्या आहेत. आता आज युपीएससी कडूनही एक परिपत्रक जारी करून कोरोना व्हायरस लॉकडाऊन पार्श्वभूमीवर आता परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल सूचवण्यात आला आहे.
Union Public Service Commission कडून विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड्स / हॉल तिकीट पुढच्या आठवड्यापर्यंत मिळणार होते. मात्र आता त्यामध्येही बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही एमपीएससीच्या परीक्षांमध्ये त्याच्या वेळापत्रकांमध्ये आता बदल करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत UGC च्या अहवालाची माहिती घेऊन राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा, कॉलेजच्या परीक्षा याबाबतही माहिती दिली जाईल. UGC Calendar 2020–21: कॉलेज आणि विद्यापीठांच्या स्थगित परीक्षा, आगामी शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया बद्दल नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या तारखा.
ANI Tweet
Civil Services (Preliminary) Examination 2020 scheduled to be held on May 31 has been deferred. New dates will be announced after a review of the situation on May 20: Union Public Service Commission #COVIDー19 pic.twitter.com/K9LKdbGsSC
— ANI (@ANI) May 4, 2020
सध्या IAS सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे आता या वेळेचा सदुपयोग करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. दरम्यान दरवर्षी 10 लाख जण सिव्हिल सर्व्हिसच्या प्रिलिम्ससाठी रजिस्ट्रेशन करतात. सुमारे 1.6 लाख विविध संस्थांचा यामध्ये सहभाग असतो. तर 2500 केंद्रांवर ही परीक्षा पार पडते.