संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) कडून UPSC ESE Prelims Exam 2023 चं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रिलिमनरी एक्झामचं (UPSC ESE Prelims Exam) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यूपीएससी ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
यंदा ESE Prelims Exam ही परीक्षा 19 फेब्रुवारी 2023 दिवशी घेतली जाणार आहे. दोन शिफ्ट्समध्ये ही परीक्षा होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते 12 असणार आहे. त्यामध्ये जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग अॅप्टिट्युट पेपर यांचा समावेश असणार आहे. तर दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 असणार आहे. यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यांचा समावेश असणार आहे. यामध्ये पहिला पेपर 200 गुण आणि दुसरा पेपर 300 गुणांचा असणार आहे. हे देखील नक्की वाचा: UPSC Calendar 2023: यूपीएससी 2023 परीक्षांचे वेळापत्रक जारी; Civil Services Prelims Exam 28 मे दिवशी; upsc.gov.in वर पहा सविस्तर.
वेळापत्रक डाऊनलोड कसं कराल?
- अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
- त्यानंतर होमपेज वरील UPSC ESE Prelims Exam 2023 time table च्या लिंकवर क्लिक करा.
- आता एक नवं पेज ओपन होईल तेथे तारखा पहा.
- हे वेळापत्रक तुम्ही डाऊनलोड देखील करून ठेवू शकता.
इथे पहा UPSC ESE Prelims Exam 2023 time table
परीक्षेपूर्वी 3 आठवडे यासाठी अॅडमीट कार्ड जारी केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून 327 जागांवर नोकरभरती करण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे.