Government Jobs 2023 | (File Photo)

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेमध्ये असलेल्यांना आता यूपीएससी (UPSC) कडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. 577 जागांसाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयात (Ministry of Labour and Employment‌‌‌), Employees’ Provident Fund Organisation मध्ये नोकरीची संधी आहे. यामध्ये 418 जागा या Enforcement Officer/Accounts Officer या पदासाठी आहेत तर 159 जागा Assistant Provident Fund Commissioner या पदासाठी असणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 मार्च असणार आहे. upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकतात.

Enforcement Officer/Accounts Officer या पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष आहेत. तर Assistant Provident Fund Commissioner साठी 35 वर्षांची वयोमर्यादा आहे. SC/STप्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांपर्यंत सूट मिळणार आहे.

Enforcement Officer/Accounts Officer पदासाठी अर्ज करणार्‍यांकडे कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. तर अर्ज करण्यासाठी 25 रूपये शुल्क आकारले जाईल. महिला, एसी, एसटी, दिव्यांग यांच्यासाठी हे शुल्क माफ केले जाणार आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणार्‍यांकडून 50 रूपये घेतले जातील.

नोटिफिकेशन मधील माहितीनुसार, उमेदवाराची निवड झाल्यास त्याला भारतामध्ये कोठेही नियुक्ती घ्यावी लागेल आणि त्याचा प्रोबेशनचा काळ 2 वर्ष आहे. नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मिळणार खुशखबर! 'या' तारखेला होणार मोठी घोषणा .

उमेदवारांची निवड करण्यासाठी पेन अ‍ॅन्ड पेपर पद्धती म्हणजे लेखी परीक्षा घेतली जाईल. शॉर्ट लिस्ट झालेल्यांच्या मुलाखती होतील. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे.