केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात Union Public Service Commission कडून UPSC CISF AC Result 20221 चा निकाल जाहीर झाला आहे. काल (8 एप्रिल) जाहीर झालेला हा निकाल UPSC ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उमेदवारांना पाहता येणार आहे.
UPSC CISF AC लेखी परीक्षा 13 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. एकूण 77 उमेदवारांना UPSC CISF AC पुढील फेरीसाठी निवडण्यात आले आहे. निवडलेल्या उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (PST)/शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि वैद्यकीय मानक चाचणी (MST) साठी आता उपस्थित राहावे लागणार आहे.
UPSC CISF निकाल 2022 वर अधिकृत सूचनेनुसआर, "केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) उमेदवारांना शारीरिक मानके/शारीरिक कार्यक्षमता चाचण्या आणि वैद्यकीय मानक चाचणी (PST/PET/MST) ची तारीख, वेळ आणि ठिकाण सूचित करणार आहे. या यादीत ज्या उमेदवाराचा रोल नंबर आहे, त्यांना त्याबाबत कोणतीही सूचना न मिळाल्यास, तो/ती ताबडतोब CISF अधिकार्यांशी संपर्क साधू शकतात.
कसा पहाल निकाल?
- Union Public Service Commission ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर क्लिक करा.
- होमपेजवर 'Written Result CISF AC (EXE) LDCE 2022' लिहलेल्या लिंकवर क्लिक करा.
- नव्या पेज वर एक पीडीएफ ओपन होईल. ती स्क्रोल करून निकाल पहा.
- हा निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊटच्या स्वरूपात ठेवू शकता.
इथे पहा निकालची थेट लिंक.
परीक्षेशी संबंधित गुण आणि इतर तपशील आयोगाच्या वेबसाइटवर अंतिम निकाल प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत म्हणजेच मुलाखत इ.नंतर उपलब्ध असतील आणि 30 दिवसांच्या कालावधीसाठी वेबसाइटवर उपलब्ध असतील.