UGC NET 2019 Result: नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट National Eligibility Test परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल ntanet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 6 लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले होते. सुमारे 4756 उमेदवार JRF साठी निवडण्यात आले आहेत तर 55701 जणांनी असिस्टेंट प्रोफेसरची परीक्षा पास केली आहे.
कसा पहाल निकाल?
- National Testing Agency (NTA)च्या अधिकृत वेबसाईट ntanet.nic.in. वर क्लिक करा.
- UGC NET Result 2019, NTA NET Result 2019, NET 2019 अशा लिंक वर क्लिक करा
- तुमचा रोल नंबर एन्टर करा
- NTA UGC NET Result 2019, NTA NET 2019 डाऊनलोड करता येऊ शकतो.देशभरात 91 शहरांमध्ये UGC NET परीक्षा घेण्यात आली होती. 20 जून ते 26 जून दरम्यान ही परीक्षा दोन टप्प्यात पार पडली आहे.