PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

Shikshak Parv:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (7 सप्टेंबर) 'शिक्षक पर्वा'च्या उद्घाटन संम्मेलनाला व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. याच दरम्यान, शिक्षण क्षेत्रासंबंधित काही महत्वपूर्ण घोषणा सुद्धा केल्या जाणार आहेत. शिक्षण मंत्रलायाच्या शिक्षकांचे अमूल्य योगदान आणि नवी शिक्षण निती 2020 पुढे चालवण्यासाठी 5-17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरा केला जात आहे. तर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या विधानानुसार, मोदी इंडियन साइन लॅग्वेंज डिक्शनरी, टॉकिंग बुक्स, स्कूल क्वालिटीशी इंन्शुरन्स अॅन्ड असेसमेंट फ्रेमवर्क ऑफ सीबीएसई, एनआयपीयुएन भारत आणि विद्यांजलि पोर्टलसाठी NISHTHA टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामची सुरुवात करणार आहेत.(PM Narendra Modi बनले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते, तर मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष Andrés Manuel López Obrador दुसऱ्या स्थानी)

पीएमओ यांनी असे म्हटले की, शिक्षक पर्व हा उत्सव हा केवळ सर्व स्तरावरील शिक्षणाची निरंतरता सुनिश्चित करणार नसून देशभरातील सर्व शाळांना क्वालिटी, इंक्सूसिव प्रॅक्टिसिस आणि सस्टेनेबिलिटीमध्ये सुधार आणण्यासाठी इनोव्हेटिव प्रॅक्टिसिसला प्रोत्साहन देणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अन्य शिक्षण राज्य मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रमानंतर 17 सप्टेंबर पर्यंत वेबिनार, चर्चा आणि प्रेजेन्टेंशन असणार आहे. ज्यामध्ये देशातील विविध शाळांमधील शिक्षणतज्ज्ञांना त्यांचे अनुभव, शिकणे आणि पुढे रोडमॅप शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

एक अधिकाऱ्यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणाशी संबंधित विविध पैलूंना संबोधित करतील. ते शालेय शिक्षण विभागाचे पाच उपक्रमही सुरू करणार आहेत.या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, सुभाष सरकार आणि राजकुमार रंजन सिंह देखील उपस्थित राहतील. उद्घाटन परिषदेनंतर, वेबिनार, सेमिनार इत्यादी 17 सप्टेंबरपर्यंत आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये देशातील विविध शाळांतील शिक्षणतज्ज्ञांनाही त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.