SBI PO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोकर भरतीची वेळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे एसबीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या 2056 PO च्या पदावर अर्ज करण्यासाठी उद्या अंतिम तारीख आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असेल त्यांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in येथे भेट द्यावी.
SBI ने असे म्हटले की, पीओच्या पदांवर अर्ज करणाऱ्यांनी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून कोणत्याही विषयात पदवीधर असावे. त्याचसोबत ज्यांनी आपली ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्ष/सेमिस्टर मध्ये आहे ते सुद्धा अर्ज करु शकता. या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, त्यांनी जर मुलाखतीसाठी बोलावले तर त्यांनी 31 डिसेंबर 2021 ला किंवा त्याआधी पदवीची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.(IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसच्या पदावर नोकर भरती, जाणून घ्या अधिक)
पीओ पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 1 एप्रिल 2021 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावेत. तसेच, उमेदवार 1 एप्रिल, 2021 नंतर आणि 2 एप्रिल, 1991 पूर्वी जन्मलेले नसावेत. दुसरीकडे, विविध श्रेणीतील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार सवलत दिली जाईल.(MPSC Exam Updates: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याकरिता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ)
एसबीआय पीओच्या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. तेथे करियर या लिंकवर क्लिक करावे. आता लेटेस्ट घोषणा सेक्शन अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसरच्या भरतीनुसार ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. अर्ज करताना उमेदवारांनी फोटो आणि अन्य महत्वाची कागदपत्रे द्यावी. अर्ज भरल्यानंतर तो डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी.