MPSC Exam Updates: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याकरिता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
MPSC logo (Photo Credits: Website)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 (State Service Preliminary Examination) ची जाहिरात देण्यात आली होती. 390 जागांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 होणार असून त्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आले होते यामध्ये आता एमपीएससीने विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. दरम्यान यंदाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 2 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. नक्की वाचा: MPSC Exam: एमपीएसीची नवी जाहीरात, राज्य सेवा परीक्षेत 100 जागा वाढवल्या; परिपत्रक जाहीर .

दरम्यान काल एमपीएससीने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात असून विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे.

एमपीएससी ट्वीट

यंदा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 2 जानेवारी 2022 दिवशी, मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 ला होणार आहे. यासाठी 5 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. ही अर्ज प्रक्रिया सशुल्क असून ुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आहे.

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी भराती होणार आहे.