IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसशिपच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या नोकर भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशनय अप्रेंटिसच्या एकूण 1900 रिक्त पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. ही नोकर भरती मथुरा, पानीपतसह अन्य ठिकाणी केली जाणार आहे.(Maharashtra TET Exam 2021 Date: शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा लांबणीवर; 30 ऑक्टोबर ऐवजी 21नोव्हेंबरला)
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयओसीएलची अधिकृत वेबसाइट iocrefrecruit.in येथे भेट द्यावी. त्यानंतर होम पेजवर दिल्या गेलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोंबर पासून सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.(MPSC Exam Updates: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याकरिता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ)
IOCL अप्रेंटिसशिप द्वारे जाहीर करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार, टेक्निशियन अप्रेंटिसच्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 नंतर संबंधित ट्रेडमध्ये फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा. तसेच ट्रेस अप्रेंटिसच्या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फुल टाइम ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेली असावी. तर डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी कमीतकमी 12 वी पास असावे. रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑक्टोंबर 2021 ला 18 वर्षापेक्षा कमी आणि 24 वर्षापेक्षा अधिक नसावे.