SBI PO Mains Admit Card 2021 जारी; sbi.co.in वरून अशी करा डाऊनलोड
SBI (Pic Credit- SBI Twitter)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) कडून Probationary Officers या पदासाठी होणार्‍या मुख्य परिक्षेची हॉल तिकीट्स जारी करण्यात आली आहेत. ही परीक्षा ऑनलाईन मोड मध्ये होणार आहे. त्यामुळे एसबीआय पीओ परीक्षेला सामोरं जाणार्‍यांनी ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी एसबीआय ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट देणं आवश्यक आहे.

Probationary Officers पदासाठी यंदा ऑनलाईन मेन परीक्षा 2 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही अ‍ॅडमीड कार्ड्स डाऊनलोड करू शकता. हे देखील वाचा: SBI CBO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भर्ती, एकूण जागा, पदे आणि प्रक्रिया घ्या जाणून .

SBI PO mains admit card 2021 कशी कराल डाऊनलोड

  • एसबीआय ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
  • करियर सेक्शन निवडा.
  • "Download Mains Exam Call Letter" च्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा Registration Number, Password आणि captcha code सबमीट करा.
  • SBI mains admit card तुम्हांला स्क्रीनवर पाहता येणार आहे.
  • तुमचं अ‍ॅडमीट कार्ड तपासून डाऊनलोड करून ठेवा. तुमच्यासाठी त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.

SBI PO main admit card 2021 थेट डाऊनलोड करण्यासाठी या डिरेक्ट लिंकला भेट द्या.

ऑनलाईन माध्यमातून होणारी ही परीक्षा 200 मार्कांची ऑब्जेक्टिव्ह तर 50 गुणांची सविस्तर उत्तर लिहण्यासाठी असते. 2056 जागांवर probationary officers या पदासाठी भरती करण्याकरिता ही परीक्षा होणार आहे. यापूर्वी 20 आणि 27 नोव्हेंबरला देखील परीक्षा झाली आहे.