SBI CBO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भर्ती, एकूण जागा, पदे आणि प्रक्रिया घ्या जाणून
SBI | (Photo Credits: PTI)

सरकारी नोकरी (Sarkari Naukri) शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) विविध पदांसाठी भरती करत आहे. या पदांची संख्या जवळपास 1226 इतकी आहे. ही पदे सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पातळीवरील आहेत. बँकींग क्षेत्रात काम करु पाहणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून एसबीआय (SBI Recruitment 2021) अर्ज मागवत आहे. तुम्हीही इच्छुक आणि पत्र असाल तर या पदांसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी पदांची संख्या, पदे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि इतर माहिती घ्या जाणून.

एसबीआयने विविध पदांबाबत जाहिरातींच्या माध्यमातून माहिती दिली आहे. जाहिरात क्रमांक CRPD/CBO/2021-22/19 नुसार एकूण जागा 1226 इतक्य आहेत. ही पदे सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पातळीवरील आहेत. पदसंख्या आणि वर्गीकरण पुढील प्रमाणे- एससी (SC) 158+13 पदे, ओबीसी (OBC) 107+52 पदे, जीईएन (GEN ) 110+453 एकूण पदे 1226. पदांसाठी शैक्षणीक पात्रता पुढील प्रमाणे, उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवारास बँक क्षेत्राताली कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असावा.

दरम्यान, नोकरीसाठी निवडले गेल्यास उमेदवाराचे नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत भरात कोठेही असणार आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क पुढील प्रमाणे- General/OBC/EWS वर्गासाठी 750/- रुपये. एससी (SC), एसटी (ST), पीडडब्ल्युडी (PWD) वर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2021 इतरी आहे. तर या पदांसाठी परीक्षा (Online): जानेवारी 2022 मध्ये पार पडेल.