
10 वी पास ITI केलेल्या तरूणांसाठी रेल्वे मध्ये नोकरीची संधी आहे. पश्चिम रेल्वे कडून अप्रेंटिसशीप 2022 साठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिश्ट, कारपेंटर, पेंटर सह अनेक ट्रेड्स साठी अप्रेंटिसशीप पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 28 मे पासून सुरू झाले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरआरसी वेस्टर्न रेल्वेची वेबसाईट rrc-wr.com च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 27 जून 2022 आहे.
पश्चिम रेल्वे मध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिश्ट, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशन, वायरमॅन, प्लंबर, स्टेनोग्राफर समवेत विभिन्न पदांवर एकुण 3612 जागांवर भरती करणार आहेत. ऑनलाईन अर्जांमधून उमेदवार निवडले जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेतील या अप्रेंटिसशीप 2022 साठी अर्ज करणारा उमेदवार हा 10वी पास असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 उत्तीर्ण असताना किमान 50% मार्क्स आवश्यक आहे. सोबतच बोर्डाच्या 10+2 मधील 10वी पास असणं आवश्यक आहे. सोबतच संबंधित ट्रेड मधील आयटीआय चं सर्टिफिकेट असनं आवश्यक आहे. वयोमर्यादा कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 24 वर्ष आवश्यक आहे. नक्की वाचा: IIT Bombay Recruitment 2022: आयआयटी बॉम्बे मध्ये नोकरीची संधी; 9 जून पूर्वी iitb.ac.in वर करा अर्ज .
SC,ST,PWD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही आवेदन शुल्क नसेल. तर उर्वरित सार्या उमेदवारांना 100 रूपये आवेदन शुल्क भरावं लागणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग द्वारा भरावे लागणार आहे. इथे पाहा सविस्तर नोटिफिकेशन .
पात्र उमेदवारांची निवड ही 10 वी मधील मार्क्स आणि आयटीआय मधील मार्क्सच्या आधारे होणार आहे. या अप्रेंटिसशीपसाठी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही.