प्रतिकात्मक फोटो (File Photo)

द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे  (The Indian Institute of Technology  Bombay ) कडुन 31 जागांवर नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनिअर्स, ज्युनियर इंजिनिअर्स आणि असिस्टंट्स या पदांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. दरम्यान यासाठी इच्छूक उमेदवार iitb.ac.in वर अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अ‍ॅप्लिकेशन विंडो 9 जून 2022 ला बंद होणार आहे. यामध्ये 1 Superintending Engineer आणि Junior Engineer साठी 8 पदं आहेत. दरम्यान Junior Engineer रिक्त पदांसाठी, 1 पद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी, 3 OBC-NCL, 1 EWS श्रेणीसाठी आणि उर्वरित 3 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

दुसरीकडे, IIT बॉम्बेने कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदासाठी 22 रिक्त जागा देखील जारी केल्या आहेत ज्यात 7 एससी श्रेणीसाठी, 4 एसटी श्रेणीसाठी, 2 EWS श्रेणीसाठी आणि 9 पदे अनारक्षित श्रेणीसाठी ठेवण्यात आली आहेत. नक्की वाचा: MPSC Rajyaseva Prelims Exam 2022: राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी, 161 पदांवर होणार भरती; 1 जून पूर्वी mpsc.gov.in वर करा अर्ज .

पगाराची श्रेणी काय असेल?

  • अधीक्षक अभियंता अर्थात Superintending Engineer- (वेतन स्तर 13, 123100-215900)
  • कनिष्ठ अभियंता अर्थात Junior Engineer (वेतन स्तर 6, 35400-112400)
  • Junior Administrative Assistant म्हणजेच कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक- (वेतन स्तर 3, 21700-69100)

ज्या उमेदवारांना IIT बॉम्बेच्या विविध रिक्त पदांबद्दल आणि पात्रतेच्या निकषांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी IIT Bombay च्या iitb.ac.in या अधिकृत साइटला भेट द्यावी आणि करिअर पोर्टल विभाग पहावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.