RBI Assistant Recruitment: आरबीआयमध्ये 950 सहाय्यक पदासाठी नोकर भर्ती, जाणून घ्या योग्यतेसह अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक
File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

RBI Assistant Recruitment: आरबीायमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण येथे सहाय्यक पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आरबीआयकडून आपल्या विविध कार्यालयांध्ये सहाय्यकाच्या 950 जागांसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. आरबीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या या परिपत्रकानुसार सहाय्यकाच्या रिक्त पदांवर नियुक्तीच्या हेतुने उमेदवारांची निवड करण्यासाठी सहाय्यक-2022 भर्ती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेने ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या, सहाय्यक पदांसाठी आरबीआयने छोटी जाहिरात जारी केली आहे आणि पात्रतेच्या तपशिलांशी संबंधित माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध केलेली नाही, जी उमेदवार आरबीआय सहाय्यक भर्ती 2022 च्या अधिसूचनेद्वारे घेऊ शकतात. मागील वर्षांच्या RBI सहाय्यक भरती अधिसूचनांनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा अंतिम वर्ष किंवा सेमिस्टर परीक्षा दिली आहे. तसेच, कट ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.(IAF Recruitment 2022: भारतीय वायूसेनेत अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती, 19 फेब्रुवारी पर्यंत करता येईल अर्ज)

RBI सहाय्यक भर्ती 2021 अंतर्गत जाहिरात केलेल्या 950 रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. RBI द्वारे 17 फेब्रुवारी 2022 पासून सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची माहिती त्याच्या सहाय्यक भरती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. त्याच वेळी, इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 मार्च 2022 पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील.