IAF Recruitment 2022: भारतीय वायूसेनेत अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती, 19 फेब्रुवारी पर्यंत करता येईल अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

IAF Recruitment 2022: भारतीय वायू सेनेच्या ओझर वायू स्थानकाच्या येथे 1 एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या अप्रेंटिस प्रक्षिक्षणासाठी वायु सेना अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना वायु सेनेत ट्रेनिच्या रुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्या परिक्षेला उपस्थितीत रहावे लागणार आहे. परंतु त्यासाठी प्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. येत्या 19 फेब्रुवारी 2022 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल.(CBSE Exams: सीबीएसई परीक्षा 2022 ऑफलाईन पद्धतीने 26 एप्रिल पासून)

IAF अप्रेंटिस परीक्षा 01 ते 03 मार्च 2022 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. याचा निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर केला जाणार आहे. तर जाणून घ्या या भरती संदर्भात अधिक. (MHT-CET 2022 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया 31 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार- Minister Uday Samant)

>'या' पदावर करण्यात येणार भरती-

मशीनिस्ट - 04

शीट मेटल - 07

वेल्डर गैस आणि निवड - 06

मैकेनिक रेडियो रडार विमान - 09

बढ़ई -  03

इलेक्ट्रीशियन विमान - 24

पेंटर जनरल - 01

फिटर - 24

योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 28 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यन apprenticeshipindia.gov.in येथे भेट देत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तर उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट 10 वी/12 वी/ आयटीआय आणि प्रॅक्टिकल परीक्षेत मिळालेल्या गुणांवरुन केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ते 21 वर्ष असावे.