Pariksha Pe Charcha 2021 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'परीक्षा पे चर्चा', इथे पाहा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
Pariksha Pe Charcha | (Photo Credit: twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (7 एप्रिल) सायंकाळी 7 वाजता 'परिक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha 2021) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केला जाणार आहे. 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha 2021) या कार्यक्रमाची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. या कार्यक्रमाचे आपण लाईव्ह स्ट्रीमिंगही (Pariksha Pe Charcha Live Streaming) पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमचे बहाद्दर परीक्षा योद्धे, पालक आणि शिक्षकांसोबत अनेक विषयांवर मजेशीर संवाद, गप्पा आणि स्मरणीय चर्चा. 7 एप्रिल सायंकाळी 7 वाजता नक्की पाहा. परीक्षा पे चर्चा. पंतप्रधानांनी पुढे #PPC2021 असा हॅशटॅगही दिला आहे. पंतप्रधानांनी ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात म्हटले आहे की, 'आम्ही गेल्या वर्षापासून कोरोनाच्या छायेत आहोत. त्यामुळे व्यक्तीगत भेटीचा मोह आपण सोडायला हवा. नव्या प्रारुपात 'परीक्षा पे चर्चे'त डिजिटल प्रणालीद्वारे मी आपल्या सोबत असेन.

परीक्षा पे चर्चा 2021 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 14 मार्च पर्यंत पूर्ण करण्यात आली होती. शिक्षण मंत्रालयाने एका प्रतिक्रियेत म्हटले होते की, यंदा 17 फेब्रुवारी पासून 14 मार्च दरम्यान विविध विषयांवर इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षक आणि पालकांना ऑनलाईन रचनात्मक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे 14 लाख स्पर्धकांनी परीक्षा पे चर्चा च्या चौथ्या संस्करणासाठी स्पर्धेत भाग घेतला. (हेही वाचा, ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये 'या' पदांसाठी नोकर भरती, येत्या 21 एप्रिल पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज)

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसर, या स्पर्धेत विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. या वेळी हे विद्यार्थी पंतप्रधानांना आपले प्रश्नही विचारु शकतात. विजेत्यांना पंतप्रधानांची स्वाक्षकरी असलेले फोटोही पाठविण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 पासून परीक्षा पे चर्चा कार्यक्रम करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडीयमवर केले जाते. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात. यातून विद्यार्थ्यांचा तणाव दूर होईल असे उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदी सूचवत असतात.