ONGC Recruitment 2022: 922 नॉन एक्झिक्युटीव्ह पदांसाठी नोकरभरती जाहीर; ongcindia.com वर 28 मेपूर्वी करा अर्ज
Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ओएनजीसी (ONGC) कडून 922 नॉन एक्झिक्युटीव्ह पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. 7 मे पासून त्यासाठी अर्ज करायची प्रक्रिया सुरू झाली असून 28 मे पर्यंत इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात. यासाठी उमेदवारांना ओएनजीसीची अधिकृत वेबसाईट www.ongcindia.com ला भेट देणं आवश्यक आहे.

एका कम्प्युटर बेस्ट परीक्षेद्वारा उमेदवार निवडले जाणार आहेत. अर्ज दाखल करताना General/OBC/ EWS उमेदवारांना 300 रूपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PWBD/ Ex-serviceman या प्रवेश शुल्क माफ असणार आहे. इथे पहा नोकरभरतीचं सविस्तर नोटिफिकेशन .

हे देखील नक्की वाचा: ONGC कडून 3614 Apprentice Vacancies जाहीर; 15 मे पूर्वी करा ongcindia.com वर अर्ज .

कसा कराल अर्ज?

  • ONGC ची वेबसाईट www.ongcindia.com ला भेट द्या.
  • होम पेज वरील करियर टॅब सिलेक्ट करा.
  • आता अप्लाय लिंक शोधा
  • अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा.
  • अर्ज दाखल करून आवश्यक कागदपत्रं देखील अपलोड करा.
  • अर्जाची हार्ड कॉपी तुमच्यासाठी ठेवा

अर्ज करण्यासाठी या डिरेक्ट लिंक वर देखील क्लिक करू शकता.

अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे व्हॅलिड इमेल अ‍ॅड्रेस असणं आवश्यक आहे. सोबत अ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर, स्कॅन केलेला रिसेन्ट फोटोग्राफ, फोटोच्या मागे पांढरा बॅकग्राऊंड आवश्यक, हा फोटो  jpeg/ jpg फॉरमॅट मध्ये असावा. 100 kb पर्यंत साईझ असावी. पांढर्‍या बॅकग्राऊंड वर स्वाक्षरी असावी. ती देखील 100 kb पर्यंत साईझ आणि jpeg/ jpg फॉरमॅट मध्ये असावी.