NEET-PG Exam 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीचे संकट आणि देशातील वैद्यकीय कर्मचार्यांची संख्या वाढविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, नीट-पीजी परीक्षा कमीतकमी 4 महिने पुढे ढकलण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार, एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ड्यूटी सौम्य लक्षणं असणाऱ्या कोविड रुग्णांच्या सेवेसाठी लावण्यात येईल. बीएससी (नर्सिंग) / जीएनएम पास परिचारिकांची सेवा वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ नर्सिंग ड्यूटीसाठी लावण्यात येईल. (वाचा - CBSE Board 10th Result 2021 Date: दहावीचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर; बोर्डाने केली घोषणा)
यासह कोविड-19 ड्युटीचे 100 दिवस पूर्ण केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आगामी सरकारी नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येईल. यासह कोविड मॅनेजमेंटमधील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मेडिकल इंटर्नची ड्युटीही लागू केली जाईल. (वाचा - MBBS Exam: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार एमबीबीएसची परीक्षा; अमित देशमुख यांची माहिती)
Prime Minister Narendra Modi authorises keys decisions to boost availability of medical personnel to fight COVID-19. NEET-PG Exam to be postponed for at least 4 months: Prime Minister's Office
— ANI (@ANI) May 3, 2021
या व्यतिरिक्त कोविड-19 ड्युटीचे 100 दिवस पूर्ण केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कोविड नॅशनल सर्व्हिस सन्मान (Prime Minister’s Distinguished Covid National Service Samman) देण्यात येईल.