
MSBSHSE SSC, HSC Results 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा यंदा लवकर झाल्या असल्याने आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. 15 मे पर्यंत निकाल लागणार असल्याचं बोर्डाने आणि शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता जसजसा मे महिना पुढे सरकत आहे तसतशी निकालाची उत्सुकता वाढत आहे. दरम्यान या निकालांच्या तारखेचे काही अंदाजही मीडीया रिपोर्ट्समधून समोर येत आहेत. त्यामुळे पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. पण बोर्डाने विद्यार्थ्यांना, पालकांना अशा मीडीया रिपोर्ट्सवर विश्वास न ठेवण्याचे आणि 5 मे दिवशी निकाल लागणार आहे अशा वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.
ET Now Digital च्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकार्याने 5 मे दिवशी 10वी, 12वी चे निकाल लागणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. बोर्ड सध्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लावण्याच्या विचारात असल्याचं एका वरिष्ठ अधिकार्याने म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही 10वी, 12वी चा निकाल हा पहिल्यांदा 12वीचा आणि नंतर काही दिवसांनी 10वीचा जाहीर केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी, बारावीचा निकाल 15 मे पर्यंत लावणार असल्याचं सांगण्यात आले असले तरीही अद्याप बोर्डाने 10वी, 12वी बोर्ड परीक्षा निकालाची ठोस तारीख जाहीर केलेली नाही. निकाल जाहीर होण्याआधी केवळ 1 दिवस आधीच त्याची तारीख जाहीर केली जाते. निकाल जाहीर करताना सकाळी बोर्ड 11 च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जारी करते मगच दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल, गुणपत्रिका ऑनलाईन जारी केली जाते. नक्की वाचा: MHT CET 2025 PCM Re-Test Announced: एमएचटी सीईटीच्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटीमुळे आता 5 मे दिवशी होणार फेर परीक्षा .
महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी निकाल पाहण्यासाठी काय हवं?
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी तुम्हांला आईचं नाव आणि तुमचा रोल नंबर हे तपशील टाकावे लागणार आहे. हा निकाल ऑनलाईन माध्यमातून पाहण्यासाठी mahresult.nic.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सला भेट द्या. SMS च्या माध्यमातूनही तुम्हांला निकाल पाहता येणार आहे.
बोर्ड परीक्षेचा कसा पहाल निकाल?
- बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.
- सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.
यंदा राज्यामध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान झाल्या आहेत. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर परीक्षार्थी होते. 5 हजार 130 मुख्य केंद्रांवर राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा पार पडली आहे.