निकाल । File Image

काल नीट परीक्षेच्या निकालानंतर आता अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी आवश्यक एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे. सीईटी सेल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 16 जूनला PCM, 17 जूनला PCB चा निकाल होणार आहे. विद्यार्थी निकाल cetcell.mahacet.org वर लॉगिन करून पाहू शकणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षाच्या पदवीच्या कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MHT CET 2025 प्रवेश परीक्षा घेतली जाते. वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीतील अर्जदारांना सामावून घेण्यासाठी PCM आणि PCB गटांसाठी MHT CET 2025 परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात आली. यामध्ये पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स तर पीसीबी मध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजीचा समावेश असतो. इंजिनियरींग प्रवेशासाठी आता PCM विषय बंधनकारक नाहीत; AICTE चा निर्णय.   

MHT CET 2025 Result ऑनलाईन कसा पहाल?

  • अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होमपेज वर निकालाची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. यामध्ये registered email ID आणि password टाका.
  • आता निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करता येईल.

MHT CET PCB परीक्षा 2025 ही 10 आणि 14 एप्रिल वगळता 9 ते 17 एप्रिल दरम्यान घेण्यात आली. MHT CET PCM परीक्षा 24 एप्रिल वगळता 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात आली. MHT CET PCM 2025  साठी 5 मे 2025  रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली.