
MHT-CET Exam Schedule 2019: इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्षास प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षेस आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षा महाराष्ट्रभर होत असून, त्या २ ते १३ मे या कालावधीत पार पडणार आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये या परीक्षा पार पडतील. प्रतिदिन दोन सत्र अशा पद्धतीने या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचा सामायिक प्रवेश परीक्षा सेल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम सीईटी परीक्षांचे आयोजन करतो. या परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्रातील परीक्षार्थींच्या एकूण संख्येबाबत बोलायचे तर, तब्बल 3 लाख 96 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षा देतील.
दरम्यान, सीईटी आयुक्त आनंद रायते यांच्या हवाल्याने एबीपी माझा या वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तानुसार परीक्षार्थींना सीईटी सेलने कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या करायच्या नाहीत याबाबत सूचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्रावर दाखल होताना परीक्षार्थींकडे ओळखपत्र असणे महतत्त्वाचे आहे. हे प्रमाणपत्र वैध असेल तसेच मूळ कागदपत्रांवरील उमेदवाराचे छायाचित्र आणि त्याच्या स्वाक्षरी वैध ठरणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्याने भरलेल्या ऑनलाईन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता भरताना काही चुका झाल्या असतील, त्याबाबत विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर जाऊन हमीपत्र भरून देण्याची सूचनाही विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. (हेही वाचा, दहावीच्या निकालानंतर करिअर निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या)
उमेदावारासाठी आवश्यक कागदपत्रे
|
सीईटी सेलने उमेदवारांना परीक्षेदरम्यान काय करावे आणि काय करू नये? या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे ठरणार असून, विहित वेळेतच उमेदवारांनी केंद्रावर पोहोचावे, अशी माहिती सीईटी आयुक्त आनंद रायते यांनी दिली. परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे असून ते वैध असेल तरच उमेदवाराच्या मूळ कागदपत्रांवरील छायाचित्र आणि स्वाक्षरी वैध ठरणार असल्याचे रायते यांनी सांगितले. अर्जदाराच्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असेल, तर हमीपत्राचा नमुना अर्ज भरुन परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची महत्त्वाची सूचना उमेदवारांना करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी आवश्यक असल्याने, या वर्षी सीईटी कक्षामार्फत विद्यार्थी ही परीक्षा उत्तम पद्धतीने कसे देऊ शकतील, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रायते यांनी सांगितले.