दहावीच्या निकालानंतर करिअर निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

दहावी बोर्ड परिक्षा (SSC Board Exam) फार महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जाते. कारण या परिक्षेच्या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे याबद्दल आपली विचार प्रक्रिया सुरु करतो. त्यामुळे करिअरसाठी घेतलेला निर्णय हा पूर्ण आयुष्यासाठी लागू होतो असे मानले जाते. कोणत्याही एका क्षेत्राची निवड करणे हा विद्यार्थ्याचा महत्वापूर्ण निर्णय असतो.

तर कोणत्याही क्षेत्राची निवडण करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने सगळ्या गोष्टींचा विचार करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे करिअरबद्दल निर्णय घेण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी जरुर जाणून घ्या.

(Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?)

-तुमची आवड जोपासा

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी प्रथम आपली आवड कोणत्या विषयात आहे हे ठरवावे. त्याचसोबत निवडलेल्या विषयात आपण पुढे उत्तम कामगिरी करु शकतो का किंवा त्यासाठी अजून कोणते विविध पर्याय आहेत हे तपासावे. ही महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी.

- तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार उत्तम क्षेत्राचा पर्याय निवडा

विद्यार्थ्यांनी आपल्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गुणांच्या आधारे करिअरचे क्षेत्र निवडण्याचे ठरवावे. तसेच विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमतेनुसार आपण निवडलेल्या विषयात आपण कितपत उत्तम अभ्यास करु शकतो हे सुद्धा ठरवावे.

-करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडण्यापूर्वी विचार करा

दाहावीच्या निकालानंतर क्षेत्र निवडण्यापूर्वी विचार करावा. तसेच सध्या विविध पर्याय करिअरसाठी उपलब्ध असल्याचे त्याची प्रथम माहिती घ्यावी.

-अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या

जर तुम्हाला भावी आयुष्यासाठी उत्तम करिअरची निवड करायची असल्यास एका अनुभवी व्यक्तिची मदत घ्या. तसेच तुम्हाला करिअर निवडण्याच्या संबंधित कोणत्याही अडचणी येत असल्यास बिंधास्तपणे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्या.

तर यंदाचा दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.