Medical College Exams 2020: MBBS च्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय Promoted करणार नाही, MCI विद्यापीठाकडून मार्गदर्शन सूचना जाहीर
Exams | Representational Image (Photo Credits: Getty Images)

मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया (MCI) यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार एमसीआय यांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स यांनी एमबीबीएस युनिवर्सिटी/कॉलेज परीक्षा आणि एक्सटर्नल परीक्षेसंबंधित निर्णय घेतला आहे. तर MCI यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर करत असे म्हटले आहे की, एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याशिवाय त्याला पुढच्या लेव्हला जाता येणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रमोटेड केले जाणार नाही आहे. महाविद्यालयांसाठी एमबीबीएस परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना ती द्यावी लागणार आहे.

मार्गदर्शक सुचनेत पुढे असे सांगण्यात आले आहे की, महाविद्यालय सुरु झाल्यानंतर दोन महिन्यानंतर एमबीबीएस परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर जवळजवळ एका महिन्यात फर्स्ट एमबीबीएस युनिव्हर्सिटी परीक्षा घेतली जाणार आहे. एमसीआय बोर्ड ऑफ गर्व्हर्नर्स यांनी मेडिकलच्या एमबीबीएस परीक्षेसाठी काही सूट दिली आहे. ही सूट एक्सटर्नल परीक्षेसाठी परीक्षकांची नियुक्ती आणि परीक्षेच्या पॅटर्न संबंधित आहे. पीजी मेडिकल एमबीबीएस विद्यापीठाच्या परीक्षा परीक्षांच्या पार्श्वभुमीवर घेण्यात येतील. (New National Education Policy 2020: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे सूत्र 5+3+3+4)

जर कोरोना व्हायरसमुळे एक्सटर्नल परीक्षक उपलब्ध नसल्याच्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या येथून परीक्षकांना बोलावले जाईल. या एक्सटर्नल परीक्षकांना परीक्षेच्या ठिकाणी उपस्थिती लावणे आवश्यक असणार आहे. तसेच हे सुद्धा संभव नसल्यास अर्धे परीक्षक परीक्षेच्या ठिकाणी उपस्थितीत राहतील आणि उर्वरित परीक्षक व्हिडिओ कॉफ्रेंसिंगमध्ये सहभागी होतील.  या व्यतिरिक्त क्लिनिकल/प्रॅक्टीकल परीक्षेसाठी सुद्धा OCSE/OSPE, सिमुलेशन्स, केस सिनेरियो सारख्या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो.