अवघ्या 21 वर्षी मंयक सिंह सुनावणार कोर्टात निकाल; बनला सर्वात लहान वकील
Mayank Singh (Photo Credits: ANI)

अवघ्या एकवीस वर्षांचा एक तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. मंयक प्रताप सिंह असं या तरुणाचं नाव असून तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच तो कोर्टात निकाल सुनावणार असल्यामुळे या अभुतपूर्व यशासाठी देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मयंक हा राजस्थानमधील जयपूर येथे राहतो. "मला लहानपणापासूनच कायद्याच्या सेवा आणि समाजात न्यायाधीशांना मिळणाऱ्या आदराचे आकर्षण होते आणि म्हणूनच न्यायाधीश होण्याचे माझे स्वप्न होते ते मी या परीक्षेद्वारे पूर्ण केले आहे," असं त्याने एएनआई ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी वयाची किमान अट 23 वर्षे होती. परंतु, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 23 वरून बदलत 21 वर्षे केली. मयंकने आपल्या मुलाखतीत, "परीक्षेची वयोमर्यादा घटवण्यात आल्यानेच आपण या परीक्षेला बसू शकलो," असे देखील म्हटले.

वाहनधारकांसाठी खुशखबर! ऑनलाइन टोल भरण्यासाठी 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्वतंत्र FASTags मार्गिका सुरू होणार

दरम्यान, मयंकने 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला असून याच वर्षी त्याचा हा कोर्स पूर्ण झाला आहे.

मयंकने इतक्या लहान वयात मिळवलेले यश पाहता शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणास्त्रोत बनला आहे.