Maharashtra Scholarship Exam 2022 Result Date: 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तर तालिका mscepune.in वर जारी आता निकालाचे वेध!
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Council of Examination) घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वी च्या स्कॉलरशीप निकालाचे (Maharashtra Scholarship Exam 2022 Result) वेध आता विद्यार्थ्यांना लागले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 20 सप्टेंबरला या परीक्षेची अंंतिम उत्तर तालिका (Final Answer Key) जारी केली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांतच निकालही जाहीर केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोविड 19 संकटामुळे मागील दोन वर्षापासून या परीक्षेच्या तारखांमध्ये सातत्याने बदल झाले होते. यंदा 31 जुलैला ही परीक्षा  राज्यात पार पडली आहे. त्यामुळे परीक्षेनंतर दोन महिन्यात निकाल जारी केला जात असल्याने सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल अपेक्षित आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम उत्तरसूची जारी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरसूची जारी करण्यात आली आहे. अंतरिम उत्तरसूची  18 ऑगस्ट 2022 दिवशी जारी केली होती. त्यावर तज्ञांचे अभिप्राय जाणून घेऊन आता अंतिम उत्तरसुची बनवण्यात आली आहे. या अंतिम उत्तर तालिकेवरून  विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावला जाणार आहे. इथे पहा अंतिम उत्तरसूची.

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

कसा पहाल 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 निकाल

5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 निकाल  हा अधिकृत वेबसाईट mscepune.in वर जारी केला जातो. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हांला  तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती देऊन निकाल पाहता येणार आहे.