आज (27 मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) राज्यातील दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल (Maharashtra Board SSC Result) जाहीर केला जाणार आहे. सुमारे 16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाकडून जाहीर केला जाणार आहे. दुपारी 11 वाजता बोर्डाकडे आकडेवारी आणि नंतर 1 वाजता ऑनलाईन स्वरूपात सविस्तर मार्क्सशीट आणि टक्केवारी पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि शिक्षकांचीही उत्सुकता सध्या शिगेला पोहचली आहे. आज दुपारी विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सोबतच अन्य थर्ड पार्टी साईट्सवरही उपलब्ध आहे.
दहावी बोर्डाचा निकाल कोणत्या साईट्स वर पहाल?
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/
https://www.tv9marathi.com/
कसा पहाल दहावीचा निकाल ऑनलाईन?
MSBSHSE च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि आईचं नाव या दोन गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.
दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 10वी निकालाचा पर्याय निवडा.
आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.
त्यापुढे View Result वर क्लिक करा.
तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
ऑनलाईन सोबतच SMS द्वाराही निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून 21 मे दिवशी 12वीचा निकाल (MSBSHSE HSC Result) जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.