ISRO मध्ये वैज्ञानिक अभियंत्यांसाठी 327 पदांसाठी नोकरभरती
ISRO (Image: PTI)

Isro Recruitment 2019: भारतीय आंतराळ संस्था इस्रो (ISRO) यांनी वैज्ञानिक अभियंत्यांसाठी नोकर भरतीसाठी सुचना जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण 327 रिक्त पदांवर नोकरभरती करण्यात येणार आहे. BE/B-Tech किंवा त्या संदर्भातील पदवीधर उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानुसार इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी या नोकरभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अर्जाची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2019 ठेवण्यात आली आहे.

इस्रो मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवरांना अर्ज करता येणार आहे. तत्पूर्वी उमेदवारांना इस्रोच्या या नोकरभरती विषयीच्या अटी आणि नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तर जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया आणि पदांसाठी नोकरभरती बाबत अधिक माहिती.

नोकरभरती क्रमांक-

>>BEE 001

-वैज्ञानिक इंजिनिअर 'एससी'( इलेक्ट्रॉनिक्स), पद: 131

>>BEE 002

-वैज्ञानिक इंजिनिअर 'एससी' (मेकॅनिकल), पद: 131

>>BEE 003

-वैज्ञानिक इंजिनिअर 'एससी' (कप्युटर सायन्स), पद: 131

>>BEE 008

-वैज्ञानिक इंजिनिअर 'एससी' (इलेक्ट्रॉनिक्स), पद: 131

-उमदेवारी योग्यता:

मान्याताप्राप्त संस्था किंवा विश्वविद्यालयातून कमीतकमी 65 टक्के सीजीपीए ग्रेड पॉइंट 6.87/10 सह संबंधित विषयात BE/Be -Tech/संदर्भातील पदवी मिळालेली असावी.

-वेतन:

पे मॅट्रिक्स लेव्हल 10 नुसार वेतन दिले जाणार आहे.

-वयोमर्यादा:

जास्तीतजास्त 35 वर्षे असून 4 नोव्हेंबर 2019 च्या नुसार वयाची गणना केली जाणार आहे.

-निवड प्रक्रिया:

योग्य उमेदवारांना लेखी परिक्षांमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड केली जाणार आहे. तसेच अहमदाबाद, बंगळूरु, भोपाळ, चंदीगढ, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नवी दिल्ली आणि थिरुवनंतरपुरम येथे आयोजनाचे स्थळ ठेवण्यात आले आहे.

-अर्जासाठी शुल्क

>>सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये

>>महिला, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणताही शुल्क नाही.

>>शुल्काची रक्कम ऑनलाईन डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येणार आहे. त्याचसोबत बँक चलानच्या सहाय्याने ही ऑफलाइन पद्धतीने अर्जाची रक्कम भरता येणार आहे.

>>अर्जाचा शुल्क भरण्यासाठी www.isro.gov.in वर अधिक माहिती देण्यात आली आहे.(खुशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Government Job ची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी)

इस्रो मधील विविध पदांच्या नोकरभरतीसाठी अधिक माहिती वरील संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच अर्ज भरण्यापूर्वी सर्व नियम आणि अटींची पूर्तता करावी. तसेत निवड झालेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा जानेवारी 12,2020 मध्ये घेतली जाणार आहे. तर परिक्षेच्या पेपरमध्ये 80 ऑबजेक्टिव्ह प्रश्नांसाठी समान गुण असणार आहेत.