IAF Agniveer Result 2022: भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निवीर पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अग्निवीर निकाल डाउनलोड करू शकतात आणि त्यांची निवड स्थिती तपासू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
अधिकृत वेबसाइटनुसार, "24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत ऑनलाइन झालेल्या अग्निवीरवायू सेवन 01/2022 साठी STAR 01/2022 चा निकाल अपलोड करण्यात आला आहे.तो वैयक्तिक उमेदवाराच्या लॉगिनमध्ये पाहिला जाऊ शकतो. तसेच, यासंदर्भात SMS (नोंदणीकृत मोबाइल नंबर) आणि सर्व निवडलेल्या उमेदवारांना ईमेल पाठवला जात आहे." (हेही वाचा - CA Foundation Result 2022: ICAI CA परीक्षेचा निकाल icai.nic.in वर जाहीर)
भारतीय हवाई दलाने 24 जुलै 2022 रोजी 'अग्निपथ' योजनेअंतर्गत परीक्षा घेतली. IAF नुसार, लाखो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला. परीक्षेतील शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL फेरीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांचे नामांकन 11 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
आयएएफ अग्निवीर निकाल 2022 कसा डाउनलोड करायचा?
उमेदवारांनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम IAF अग्निपथच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://agnipathvayu.cdac.in/AV/.
आता वेबसाइटच्या होमपेजवर दिसणार्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
आता उमेदवारांनी त्यांचा ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून सबमिट करावे.
आता तुम्ही तुमचा भारतीय वायुसेना अग्निवीर निकाल 2022 डाउनलोड करण्यास सक्षम असाल.