Maharashtra Board SSC HSC Exams Dates 2023: 10 वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत. यंदा कोरोनानंतर नियमित परीक्षा होणार असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून पूर्ण तयारी करण्यात येत आहे.
दहावीची लेखी परीक्षा २०२३ संपूर्ण वेळापत्रक PDF डाउनलोड करा इथे
बारावीची लेखी परीक्षा २०२३ संपूर्ण वेळापत्रक PDF डाउनलोड करा इथे
Maharashtra Board HSC and SSC Exam Date 2023 Declared, 12th Exams To Start on 21st February 10th On 2nd March#Maharashtra #HSC #SSC #TimeTable https://t.co/PdmsE25bsF
— LatestLY (@latestly) December 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)