इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (Institute Of Company Secretaries Of India) आज ICSI CS प्रोफेशनल प्रोग्राम निकाल 2022 जाहीर केला आहे. ही परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना icsi.edu या अधिकृत वेबसाइटवर (Website) त्यांचा निकाल बघता येणार आहे. तसेच निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय करण्यात आली आहे. तरी या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थी (students) सहज त्यांचा निकाल तपासू (Result Check) तसेच डाऊनलोड (Download) करु शकतात. ICSI CS प्रोफेशनल प्रोग्राम (Profession Program) जून (June) 2022 मध्ये परिक्षा (Examination) घेण्यात आली होती तरी परिक्षेच्या दोन महिन्यांनंतर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने आज निकाल घोषित केला आहे.
ICSI CS परीक्षेचा निकाल (examination Result) आज जाहिर करण्यात आला असला तरी गुणपत्रिकेची (Result) प्रत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील 30 दिवस वाट बघावी लागणार आहे. ICSI परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी (Students) ई-रिजल्ट स्टेटमेंट (E Result Statement) जारी करेल. म्हणजे उमेदवारांना औपचारिक ई-निकाल सह गुणांचे तपशील दिले जातील. ICSI CS डिसेंबर 2022 ची नोंदणी 26 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल आणि परीक्षा 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. ICSI CS परीक्षा 2022 मध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक विषयात किमान 40% गुण आणि एकूण 50% गुण मिळणे आवश्यक आहे. (हे ही वाचा:- BARC Job Recruitment: भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र आणि भाभा अणू संशोधन केंद्रात नोकरीची संधी)
जाणून घ्या निकाल बघण्याची प्रक्रिया:-
-ICSI च्या icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
-ICSI CS प्रोफेशनल रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
-त्यानंतर जाहिर केलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तिकडे तुम्हाला तुमचा रोल नंबर किंवा अर्ज क्रमांक टाका.
- त्यानंतर तुमची जन्मतारीख टाका.
- लगेच ICSI CS मार्कशीट तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- ICSI CS मार्कशीटच्या बाजूला डाऊनलोड ऑप्शनवर क्लीक करत तुम्हाला तुमची मार्कशीट सहज डाऊनलोड करता येईल.