Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी (Science Stream Students) नोकरीची उत्तम (Job Opportunity) संधी आहे. जर तुम्ही तुमचं पदवीत्तर शिक्षण विज्ञान शाखेतून घेतलं असेल तर भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र आणि भाभा अणू संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्ण संधी आहे.  प्रोजेक्ट सायंटिस्ट (Project Scientist), वैज्ञानिक सहाय्यक सारख्या विविध पदांवर पदभरती केल्या जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात 138 जागांवर तर भाभा अणू संशोधन केंद्रात 36 जागांवर पदभरती (recruitment) केल्या जाणार आहे. तरी दोन्ही पदभरतीसाठी लवकरात लवकर अर्ज (Application) मागवण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी होणाऱ्या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application) स्वीकारण्यात येणार आहेत.

 

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात प्रोजेक्ट सायंटिस्ट-III (Project Scientist), प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यापैकी प्रोजेक्ट सायंटिस्ट-III पदासाठी 09 जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II पदासाठी 23 जागा आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट-I पदासाठी 59 जागा भरण्यात येणार आहे. या तिन्ही जागांसाठी  शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह M.Sc/M.Tech, M.Sc.Tech किंवा BE/B.Tech/M.E./M.Tech.चं शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास भारत भरात कुठेही नोकरीचं ठिकाण मिळू शकते. तसेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 35 ते 65 वर्ष असावं. या तिन्ही जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेबर असेल.

 

भाभा अणू संशोधन केंद्रात पदभरती केल्या जाणार आहे. येथे नर्स/ए (Nurse), वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant)/बी, वैज्ञानिक सहाय्यक/सी, उप अधिकारी/बी, वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल अशा एकूण 36 जागांवर पदभरती करण्यात येणार आहें. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय 18 वर्ष ते 45 वर्षा दरम्यान असावे.  तसेच संबंधीत अर्ज प्रक्रीया 12 सप्टेबरच्या (September) पूर्वी करणं गरजेचं असणार आहे.  पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन (Online) माध्यमातून अर्ज करता येणार आहे.