ICAI CA Admit Card 2021: डिसेंबर महिन्यात होणार्‍या सीए परीक्षेसाठी अ‍ॅडमीट कार्ड्स जारी; icaiexam.icai.org वरून अशी करा डाऊनलोड
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

The Institute of Chartered Accountants of India अर्थात ICAI ने Chartered Accountants च्या परीक्षेची अ‍ॅडमीड कार्ड्स जारी केली आहेत. ही अ‍ॅडमीट कार्ड्स डिसेंबर 2021 मध्ये होणार्‍या फाऊंडेशन, इंटरमेजिएट आणि फायनल परिक्षेची आहेत. CA December 2021 परीक्षेला यंदा सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना ही अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येणार आहेत. त्यासाठी त्यांना ICAI ची अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org.ला भेट द्यावी लागेल.

CA foundation, CA intermediate आणि CA final या तिन्ही स्तरावरील परीक्षांसाठी आता सीए अ‍ॅडमिट कार्ड 2021 डाऊनलोड करता येणार आहेत. यंदा कोणालाही फिजिकल कार्ड दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करावी लागणार आहेत.

कशी डाऊनलोड कराल अ‍ॅडमीट कार्ड्स?

  • अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org ला भेट द्या.
  • रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • अ‍ॅडमीट कार्ड वरील लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स टाका.
  • तुमचं अ‍ॅडमीट कार्ड तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
  • तुमचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढा.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस अ‍ॅडमीट कार्ड सोबत ठेवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 1 वाजल्यापासून प्रवेश दिला जाणार आहे. त्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षा पार पडेल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर स्वतःची पाण्याची बाटली, ट्रान्सपरंट हॅन्ड सॅनिटायझरची बॉटल घेऊन जाण्यास परवानगी असणार आहे.