IBPS Exam Calendar 2022–23 Released: क्लार्क ते RRB Exams साठी तयारी करणार्‍यांसाठी ibps.in वर परीक्षांच्या तारखा जारी; इथे पहा वेळापत्रक
Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Institute of Banking Personnel कडून 2022-23 मध्ये होणार्‍या क्लार्क, पीओ, आरआरबी परीक्षा यांच वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. IBPS ची अधिकृत वेबसाईट ibps.in वर विद्यार्थ्यांना ते पाहता येणार आहे. दरम्यान ज्या उमेदवारांना क्लार्क, पीओ,आरआरबी या पदासाठी अर्ज करायचे असतील त्यांना वेबसाईट वर माहिती पाहता येणार आहे. ताज्या नोटिफिकेशन नुसार, सार्‍या परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही फक्त ऑनलाईन होणार आहे. एका रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून प्रिलिम आणि मेन्स अशा दोन्ही परीक्षा देता येऊ शकतात. हे देखील नक्की वाचा: Bank of Baroda Recruitment 2022: बॅंक ऑफ बडोदा मध्ये 198 जागांवर नोकर भरतीचं नोटिफिकेशन जारी; इथे पहा bankofbaroda.in वर कधीपर्यंत करू शकाल अर्ज.

IBPS Exam Calendar 2022–23 च्या महत्त्वाच्या तारखा

  • Assistants and Officer Scale-I साठी प्रिलिम परीक्षा - ऑगस्ट 7,13,14,20 आणि 21
  • Officers Scale II & III ची एकच परीक्षा - सप्टेंबर 24,2022
  • Officer Scale I मुख्य परीक्षा - सप्टेंबर 24, 2022
  • Office Assistants - ऑक्टोबर 1, 2022
  • IBPS Exam Calendar 2022–23 डाऊनलोड कसं कराल?

IBPS ची अधिकृत वेबसाईट ibps.in ला भेट द्या.

  • स्क्रिनवर "Tentative Exam Calendar for Clerk, PO, RRB Exams" या लिंकवर क्लिक करा. तुम्हांला नव्या पेजवर नेण्यात येईल.
  • त्यानंतर IBPS Exam Calendar 2022-23 ची पीडीएफ किंवा IBPS Exam Calendar 2022-23 ची डिरेक्ट लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुम्हांला पुढे उपयोगी पडेल म्हणून हे वेळापत्रक डाऊनलोड देखील करून ठेवू शकता.

पात्र उमेदवारांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आदि गोष्टी द्याव्या लागतील. त्यानंतर परीक्षांबाबतचे पुढील नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी आयबीपीएस च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.