Bank of Baroda Recruitment 2022: बॅंक ऑफ बडोदा मध्ये 198 जागांवर नोकर भरतीचं नोटिफिकेशन जारी; इथे पहा bankofbaroda.in वर कधीपर्यंत करू शकाल अर्ज
Bank of Baroda | File Image

बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda) कडून सध्या Cash Management Department & Receivables Management Department मध्ये नोकरभरती केली जात आहे. यामध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट, हेड, नॅशनल मॅनेजर टेलिकॉलिंग, मॅनेजर, व्हाईस प्रेसिडंट आणि डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बॅंक ऑफ बडोदा कडून दोन सेपरेट रिक्रुटमेंट नोटिफिकेशन्स जारी करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण 198 जागा भरल्या जाणार आहे. उमेदवारांना याबाबतची सविस्तर माहिती www.bankofbaroda.in या संकेतस्थळावर पाहता येईल. ऑनलाईन माध्यमातून उमेदवार 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपला अर्ज सादर करू शकणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Jobs in IT: आयटी क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी; यावर्षी Infosys देणार तब्बल 55,000 जणांना नोकऱ्या.

वयो मर्यादा आणि अन्य माहिती

Assistant Vice President – Acquisition & Relationship Management यासाठी अर्ज करणार्‍यांना वयोमर्यादा 26 अर्ष ते 40 वर्ष आहे. तर Assistant Vice President – Product Manager पदासाठी अर्ज करणार्‍यांसाठी वयोमर्यादा 25 ते 40 वर्ष असणार आहे.

जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी उमेदवारांना अर्ज करताना 600 रूपये आणि एससी,एसटी, पीडब्लूडी आणि महिला उमेदवारांना 100 रूपये आकारले जाणार आहेत.

इच्छुक उमेदवारांना पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्याची लिंक www.bankofbaroda.co.in/Careers.html वर मिळेल. अधिक माहितीसाठी उमेदवार बॅंकेच्या संकेतस्थळावरील करिअर पर्यायावर क्लिक करून पाहू शकतात.